मुंबई : निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी 2 वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेटी घेतली होती. मात्र या भेटीबाबतचं नेमकं कारण समजू शकलं नव्हतं. यावर आत खुद्दं शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं.
सध्या मला सत्तेत बसण्याची कोणतीही महत्तवकांक्षा नाही. मला प्रशांत किशोर यांची मदत घेण्याची कोणतीही गरज नाही. विरोधी पक्षामध्ये समन्यवयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल, असं शरद पवार म्हणाले. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, राहुल गांधी विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार असल्याचं काँग्रेस नेतेमंडळी सांगतात. मात्र, काँग्रेस नेते आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि पुत्र नितेश राणे यांना लुकआऊट नोटीस जारी”
“भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी, त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल”
“मोठी बातमी! छगन भुजबळ यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता”