मुंबई : वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांनी मदतीसाठी विनंती केली होती.
पूजा तडस यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं पडसे यांनी स्पष्ट केलं होतं. यानंतर संध्याकाळच्या सुमारास पंकज तडस आणि पूजा यांचा विवाह पार पडला आहे. यावर पंकज तडस यांनी स्पष्टीकरण दिलं.
आपण यापूर्वीही पूजाला स्वीकारलेलं होतं आणि आताही स्वीकारतो आहे. पूजाशी मी लग्न केलं होतं. पण आता त्यांच्या इच्छेनुसार वैदिक पद्धतीनं लग्न केलं आहे. या प्रकरणात काही लोकांनी राजकीय सुपारी घेतली होती तो प्रश्न आता मिटला आहे, असं पंकज तडस यांनी म्हटलं. यावरून आता रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला.
कोणतीही मुलगी स्वत:चा संसार किंवा स्वत:चं वैयक्तिक आयुष्य कधीच चव्हाट्यावर आणत नाही. तिने वर्धा पोलिसात तक्रार दाखल केली होती. केवळ राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. म्हणून नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यांच्या सर्व तक्रारी माझ्याकडे आहेत. विवाह प्रमाणपत्रंही माझ्याकडे आहे. तिला खूप त्रास होत होता म्हणून तिने व्हिडीओतून आपली वेदना मांडली. त्यामुळे त्यांना विवाह करावा लागतोय, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या. तसेच सुपारी वगैरे घेण्याची आम्हाला भाजप सारखी सवय नाही. तसेच त्यांच्या महिला पदाधिकारी कदाचित अशा पद्धतीने षडयंत्र रचत असतील. आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहोत. ते आमचे संस्कार नाहीत. ते भाजपचे संस्कार आहेत, असा टोलाही चाकणकरांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
…तर मग नारायण राणे हे महायेडे आहेत का?; गुलाबराव पाटील
“राणे कुटूंबीय म्हणजे येड्यांची जत्रा झालीये”
माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच- धनंजय मुंडे
सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही; नवाब मलिक यांचं मोठं विधान