मुंबई : महाराष्ट्रात करोनाने थैमान घातला असून महाराष्ट्रात सर्वात जास्त 41 रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोनावर नियंत्रन मिळवण्यासाठी गर्दी ओसरली नाही, तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
सरकारी कार्यालये बंद राहणार नाहीत. मुंबईतील लोकलसेवा, बससेवा सुरूच राहील. मात्र लोकांनी घराबाहेर पडायचं टाळायला हवं. गर्दी ओसरली नाही, तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जे करता येणे शक्य आहे, अशा सर्व उपाययोजना आम्ही करीत आहोत. व्यावसायिकांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने मुंबईत बंद ठेवावीत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
महत्वाच्या घडामोडी-
करोनाची लागण झालेले रुग्ण आरोपी नाहीत, त्यांची नावं जाहीर करा; मनसेची मागणी
“…तेव्हाच आशेचा एक किरण ही आपल्या आयुष्यात येतो”
संसर्ग रोखण्यासाठी पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला ‘हा’ मोलाचा सल्ला
ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच निधन