Home महाराष्ट्र शिवसेना आणि संजय राऊत तोंडावर पडले; बेळगाव निकालानंतर निलेश राणेंचा घणाघात

शिवसेना आणि संजय राऊत तोंडावर पडले; बेळगाव निकालानंतर निलेश राणेंचा घणाघात

मुंबई : बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभवाची धूळ चारत भाजपने बेळगाव महापालिका ताब्यात घेतली. या विजयानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

बेळगावात मराठी माणसाचा भगवा फडकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. मात्र या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा पराभव केला. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर निशाणा साधला. निलेश राणेंनी बेळगाव महापालिकेत सर्व पक्षाने जिंकलेल्या जागांची आकडेवारीच देत शिवसेना व संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.

बेळगाव नगरपालिका निवडणूक ५८ जागा भाजपा ३६ काँग्रेस ९ महा एकी समिती २ Mim १ इतर, संज्या आणि शिवसेना (०) पुन्हा तोंडावर पडले, तुमची औकात काय आणि बोलता किती., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करून लाज वाटली नाही का?

माझा मुलगाही खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळतो; मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं

…तरच राज्यात सत्ताबदल होऊ शकतं; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल; नाना पटोलेंचा टोला