मुंबई : मोदी सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किमती, इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बॅनरबाजी केली आहे.
सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास! अशा आशयाचे पोस्टर लिहिण्यात आलं असून यात 2014 सालचे गॅस सिलिंडरचे दर आणि सध्याचे दर याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही या बॅनरच्या माध्यमातून मानण्यात आले आहे .
दरम्यान, 1 मार्च 2014 रोजी घरगुती गॅस सिलिंडरचा दर 410 रुपये होता. तर 1 सप्टेंबर 2021 रोजीचा दर 884 रुपये इतका झाला आहे.
VIDEO: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाण्यात पंतप्रधान मोदींविरोधात ठिकठिकाणी बॅनरबाजी pic.twitter.com/DserPcOAVQ
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही?’; संजय राऊतांची भाजपवर टीका
शेतकऱ्यांच्या बुडीत शेती कर्जमाफीचा निर्णय करा, केवळ ट्विट नको- राजू शेट्टी
‘बेळगाव तो सिर्फ झाँकी हैं, मुंबई अभी बाकी हैं’; चंद्रकांत पाटलांचा टोला