Home पुणे ‘बेळगाव तो सिर्फ झाँकी हैं, मुंबई अभी बाकी हैं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

‘बेळगाव तो सिर्फ झाँकी हैं, मुंबई अभी बाकी हैं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

पुणे : आज बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपनं बहुमत मिळवलं, तर महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

‘ज्या ज्या वेळेला निकाल आमच्या बाजूने लागत नाही त्यावेळेला ईव्हीएम बरोबर असल्याचे सांगतात. आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतात तेव्हा त्यांना ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा वाटतो. हे त्यांच्या आणि विरोधकांच्या स्वभावानुसारच आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी

यावेळी त्यांना सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है’बाबत विचारण्यात आले. त्यावर पाटील म्हणाले, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही एक-दोन नगरसेवकावरुन थेट 51 वर पोहचलो. त्याच पद्धतीने आम्ही मुंबई लढणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“आज बेळगाव महापालिकेवर ‘भगवा’ फडकला, उद्या तोच ‘भगवा’ मुंबई महापालिकेवर फडकणारच”

पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून सामुहिक बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या 8 जणांना बेड्या

जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून कोणी रोखलं आहे?; राम कदम यांचा सवाल

मोठी बातमी! करूणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; बीड जिल्हा कारागृहात होणार रवानगी