बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वाद आता पुन्हा उफाळत आहे. करुणा शर्मा यांनी फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र पत्रकार परिषदेपूर्वी पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं. यावेळी पोलिसांना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं.
बीडमधील वैद्यनाथ दर्शनासाठी करूणा मुंडे गेल्या होत्या. मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का?, असा प्रश्न करत परळीच्या महिलांनी करूणा शर्माला अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि करूणा शर्मा यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं.
दरम्यान, करूणा शर्मा यांच्या गाडीत आढळून आलेले पिस्तूल हे त्यांचेच आहे का? तसेच त्या पिस्तूलाचं त्यांच्याकडे लायसन्स आहे का? याबाबतीत पोलीस अधिक तपास करीत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही, संजय राऊतांसारखा कंपाऊंडरही नाही”
खेडमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका; भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन’तर्फे शिष्यवृत्ती जाहीर
‘बघा हे महाराज विनामास्क बसलेत’, बारामतीत अजित पवारांनी अधिकाऱ्याला खडसावलं