पुणे : कोरोनाच्या संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचे पालन राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे किमान त्यांच्या विचाराच्या राज्यातील नेत्यांनी तरी तारतम्य पाळायला हवं होतं, असं म्हणत भाजपने केलेल्या मंदिराच्या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांना फटकारलं आहे.
केंद्र सरकारने राज्य सरकारला या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. आणखी काही दिवस खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार कटाक्षाने त्या सूचना पाळत आहे. मात्र अन्य घटकांची त्याबद्दल काही मते असू शकतात. त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे. परंतु केंद्र सरकार जेव्हा अशी भूमिका घेतं तेव्हा कमीत कमी त्यांच्या विचाराच्या राज्यातील लोकांनी तारतम्य ठेवायची गरज होती. याबद्दल मला काही अधिक सांगायचं नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
पंजाब, राजस्थान मध्यप्रदेश आणि दक्षिणेतील काही राज्यात हेच सुरू आहे. आपण केवळ महाराष्ट्रातील कारवायांवर चर्चा करतो. पण हा गैरवापर महाराष्ट्रापर्यंत सीमित नाही तर हा गैरवापर इतर राज्यातही सुरू आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली, पाप केलं की कोरोना होतो; संजय राऊतांचा टोला
12 सदस्यांमध्ये राजू शेट्टींचं नाव, त्यांच्याबाबतचा निर्णय राज्यपाल घेतील- शरद पवार
महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला
राजू शेट्टी आमदार होणार की नाही; जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…