Home महाराष्ट्र “माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं...

“माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस”

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद आता पुन्हा उफाळत आहे.

करुणा मुंडे यांनी आज फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच करूणा मुंडे यांनी यावेळी धनंजय मुंडेंचा छळाचा पाढाच वाचला आहे.

मी सीबीआयकडे माझ्या पतीचे कॉल रेकॉर्ड, व्हॉट्स अ‌ॅप चॅट याची सर्व माहिती देणार आहे. आज 25 वर्षानंतर माझ्यासोबत अशा प्रकारचं कृत्य केलं जातय. माझ्या मुलांना बंद करुन ठेवलं गेलं. राक्षस, नीच सारखी लोक देखील असं कोणाशी वागणार नाहीत, असं करुणा मुंडे म्हणाल्या.

माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस. मी तिचं ऐकलं नाही म्हणून भोगत आहे, असं म्हणत करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटलांची सीबीआय चौकशी करा; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची मागणी

मी तुम्हांला शब्द देतो की…; मुख्यमंत्र्यांचं सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आश्वासन

पंकजाताई, तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची उसाच्या फडात; पंकजा मुंडे म्हणाल्या…

बेळगाव महापालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच फडकेल- संजय राऊत