Home महाराष्ट्र “…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो”

“…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो”

मुंबई : कोरोनावर चार लसी आपण भारतात तयार केल्या नसत्या तर देशात लसीकरण शक्य झालं नसतं. अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असं आपल्याला सांगितलं असतं. त्यामुळे आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत आले होते. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

कोरोनाशी आपण सर्वच संघर्ष करत आहोत. त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजही दिले आहे. परंतु, भारतासारख्या महाकाय देशात लसीकरण मोहीम राबवणं हे कठिण काम होतं. आज आपण आपल्या देशात चार लसी तयार केल्या. त्या केल्या नसत्या तर अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असं आपल्याला सांगितलं असतं. त्यामुळे आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी युती नको, स्वबळावर सत्ता मिळवू”

लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, किरीट सोमय्यांचा दावा; आव्हाडांना ईडीची नोटीस येणार?

महाराष्ट्र बंदिवान केल्याचा रेकॉर्ड उद्धव ठाकरेंच्या नावावर- आशिष शेलार

थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार; ‘या’ भाजप खासदारचा दावा