Home महाराष्ट्र महाराष्ट्र बंदिवान केल्याचा रेकॉर्ड उद्धव ठाकरेंच्या नावावर- आशिष शेलार

महाराष्ट्र बंदिवान केल्याचा रेकॉर्ड उद्धव ठाकरेंच्या नावावर- आशिष शेलार

मुंबई : मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्यासंदर्भात आणि सण साजरे करण्यासंदर्भात जनतेशी संवाद साधला होता. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या नावाखाली गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महाराष्ट्रात निर्बंध घालण्यात आले आहेत. आता कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी निर्बंध कायम आहेत. दीड ते दोन वर्षे महाराष्ट्र बंदिवान ठेवल्याचा नवा रेकॉर्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर नोंदवला जाईल, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय.

विधानसभेत सचिन वाझे याच्या संदर्भात आम्ही प्रश्न उपस्थित केला असता, मुख्यमंत्री म्हणाले होते, सचिन वाझे ओसामा बिन लादेन आहे का? त्यामुळे आता आम्ही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो, दहीहंडी फोडणारे गोविंदा महाराष्ट्राचे लादेन आहेत का? एकीकडे गोविंदांची धरपकड सुरू आहे, अटक केली जात आहे. तर दुसरीकडे बार, रेस्टारंट, पब सुरू आहेत, असं आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, तुम्ही केंद्राच्या पत्रावरून राजकारण करत आहात. केंद्राने आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे सांगितले होते. मात्र आकडेवारी बघता अनेकांचे लसीकरण झालेले नाही. मृत्यूंचे आकडे लपवण्यात आले. टेस्टची संख्या का वाढवली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वाटाघाटी करून काही गोष्टी सुरू केल्या जात आहेत, असा आरोपही आशिष शेलार यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार; ‘या’ भाजप खासदारचा दावा

“शिवसेना स्वतःचा नालायकपणा जोरकसपणे दाखवणारा एकमेव पक्ष”

सरकारच्या नाकावर टिच्चून दहिहंडी फोडली; मनसेचा दावा

“सत्तेचा गैरवापर याआधी कधी झाला नसेल तर, सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारायला हवं”