Home महाराष्ट्र सरकारच्या नाकावर टिच्चून दहिहंडी फोडली; मनसेचा दावा

सरकारच्या नाकावर टिच्चून दहिहंडी फोडली; मनसेचा दावा

औरंगाबाद : राज्यात दहिहंडी उत्सव साजरा करण्यास बंदी असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हडको परिसरात दहिहंडी फोडण्यात आली. यावरून मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला.

हिंदू सण साजरा करण्यासाठी विरोध करणाऱ्या ठाकरे सरकारच्या नाकावर टिच्चून आम्ही दहिहंडी फोडली असल्याचा दावा सुहास दशरथे यांनी यावेळी केला. तसेच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक केली असली तरी त्याला मनसे कार्यकर्ते घाबरत नसल्याचं देखील दशरथ यांनी म्हटलं.

दरम्यान, अस्वलाच्या अंगावरील केसांप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांवर कितीही केसेस दाखल झाल्या तरी त्याला न घाबरण्याची शिकवण आम्हाला राज ठाकरेंनी दिली असल्याचंही दशरथे यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“सत्तेचा गैरवापर याआधी कधी झाला नसेल तर, सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारायला हवं”

“गेंडास्वामी घाबरला… इतकी फाटली तर, कशासाठी भानगडीत पडलास”

“अनिल परब कितीही व्यस्त असले तरी त्यांनी, ईडीच्या चौकशीला सामोरं जायला हवं होतं”

“परळीत धनंजय मुंडे-प्रीतम मुंडे एकाच व्यासपीठावर दिसले; चर्चांना उधाण”