मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. तसेच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. यावऱ राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला होता.
भावना गवळी आणि अनिल परब यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर भाजपने त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळेंना असं वाटत असेल की, सत्तेचा गैरवापर याआधी कधी झाला नसेल तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारायला हवं की, इंदिरा गांधी यांच्या सरकाराच्या काळात सत्तेचा गैरवापर कसा केला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“गेंडास्वामी घाबरला… इतकी फाटली तर, कशासाठी भानगडीत पडलास”
“अनिल परब कितीही व्यस्त असले तरी त्यांनी, ईडीच्या चौकशीला सामोरं जायला हवं होतं”
“परळीत धनंजय मुंडे-प्रीतम मुंडे एकाच व्यासपीठावर दिसले; चर्चांना उधाण”
नारायण राणे-शिवसेना प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…