Home महाराष्ट्र “ईडीच्या नोटिसा पाठवून आघाडीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आम्ही दबावाला बळी पडणार नाही”

“ईडीच्या नोटिसा पाठवून आघाडीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आम्ही दबावाला बळी पडणार नाही”

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. तसेच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे भाजपचे राजकारण आहे. तसंच ईडीच्या नोटिसा पाठवून आघाडीचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही त्याला बळी पडणार नाही, असं म्हणत जयंत पाटलांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, महाविकास आघाडीचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येतंय. खासदार भावना गवळी यांच्याकडे छापे पडले हे माझ्या कानावर आलं आहे. पण महाविकास आघाडीचे नेते अशा प्रकारच्या दबावाला बळी पडणार नाहीत, असंही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आमची ईडी लागली, आता तुमची सीडी लावा; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

“चंद्रकांत पाटील हे पलंगावरून जरी खाली पडले, तरी त्यांना सरकार पडलं असं वाटत असेल”

“टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला 2 पदकं; भालाफेकपटू सुमित अंतिलने कोरलं सुवर्णपदकावर नाव”

“ठाकरे सरकारचे घोटाळा इलेव्हन; किरीट सोमय्यांचा आरोप, 11 नावं जाहीर”