जळगाव : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बोलताना, ईडी लावली तर सीडी काढेन, असं वक्तव्य आधी केलं होतं. त्यानंतर त्यांनी काल बोलताना त्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला.
मी या अगोदर म्हणालो होतो की, ईडी लावली तर सीडी लावेन. गेल्या 5-6 महिन्यांपुर्वीच ती सीडी मी पोलिसांकडे दिली आहे. आता पोलीस त्याची चौकशी करत असून चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.
सीडीचा विषय आता जुना झाला असून आमची ईडी लागली आता तुमची सीडी लावा, असा टोला गिरीश महाजन यांनी यावेळी लगावला. तसेच भाजपनेच खडसेंच्या मागे ईडी लावल्याचं महाजन यांनी कबूल केल्याचीही जोरदार चर्चा रंगली असून, अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“चंद्रकांत पाटील हे पलंगावरून जरी खाली पडले, तरी त्यांना सरकार पडलं असं वाटत असेल”
“टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला 2 पदकं; भालाफेकपटू सुमित अंतिलने कोरलं सुवर्णपदकावर नाव”
“ठाकरे सरकारचे घोटाळा इलेव्हन; किरीट सोमय्यांचा आरोप, 11 नावं जाहीर”
पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झालीये- नाना पटोले