Home महाराष्ट्र “ठाकरे सरकारचे घोटाळा इलेव्हन; किरीट सोमय्यांचा आरोप, 11 नावं जाहीर”

“ठाकरे सरकारचे घोटाळा इलेव्हन; किरीट सोमय्यांचा आरोप, 11 नावं जाहीर”

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. सोमय्यांनी ठाकरे सरकारशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला, असं सोमय्या यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झालीये- नाना पटोले

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात”

ईडी लावली, तर सीडी काढेन; एकनाथ खडसेंकडून पुनरूच्चार

खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग यांच्या मुसक्या आवळणंं गरजेचं- हसन मुश्रीफ