मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
ईडी कधी सूडाने कारवाई करत नाही. ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले असतील त्यामुळेच त्यांनी नोटीस बजावली असेल, असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं.
ईडी किंवा तपास यंत्रणांना सूडाने कारवाई करता येत नाही. आपल्या देशाचं संविधान आणि कायदा मजबूत आहे. प्रत्येक नागरिकांचा हक्क सुरक्षित केला आहे. ईडीमध्ये काही पुरावे असतील, काही तक्रार असेल किंवा काही इनपुट्स मिळाले असतील तरच ईडी कारवाई करते. जन आशीर्वाद यात्रेत तुम्ही सूडाने वागला म्हणून आम्ही सूडाने वागलो असं मानायचं कारण नाही. ईडी कुणाच्या सांगण्यावरून तपास करत नाही. काही धागेदोरे असतील म्हणूनच नोटीस बजावली असेल, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली की, संसद आत्महत्या करते- पृथ्वीराज चव्हाण
“मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस”
“शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट, चर्चांना उधाण”
“अजित पवारांनी नको त्या गोष्टीत लक्ष देऊ नये, त्यांनी त्यांचं खातं पाहावं”