जळगाव : शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. या भेटीवरून चर्चांना उधाण आलं आहे.
20 वर्षात प्रथमच आपण खडसेंच्या मुंबईच्या घरी गेलो, असं गुलाबराव पाटील यांनी या भेटीनंतर स्पष्ट केलं. या भेटीनंतर गुलाबराव पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे वारे आता सर्वत्र वाहू लागलं आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, यासाठी गुलाबराव पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. तसेच सहकार क्षेत्रात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही निवडणूक बिनविरोध करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. स्वतः गुलाबराव पाटील हे सर्व नेत्यांच्या भेटी घेत आहेत.
दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेवर सध्या एकनाथ खडसे यांचं वर्चस्व आहे त्यामुळं गुलाबराव पाटलांनी खडसेंच्या मुंबईच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“अजित पवारांनी नको त्या गोष्टीत लक्ष देऊ नये, त्यांनी त्यांचं खातं पाहावं”
विरोधकांनी अनिल देशमुखांना बदनाम केलं, पण सत्य अखेर बाहेर आलं- अमोल मिटकरी
भाजप आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर- ममता बॅनर्जी
10 दिवसात मंदीरे खुली करा अन्यथा…; अण्णा हजारेंचा सरकारला इशारा