Home महाराष्ट्र विरोधकांनी अनिल देशमुखांना बदनाम केलं, पण सत्य अखेर बाहेर आलं- अमोल मिटकरी

विरोधकांनी अनिल देशमुखांना बदनाम केलं, पण सत्य अखेर बाहेर आलं- अमोल मिटकरी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी चालू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यातच आता सीबीआयने आपल्या प्राथमिक अहवालात अनिल देशमुखांना क्लिनचीट दिल्याची माहिती समोर येत आहे. तसेच 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर विधानसभेत विरोधकांनी अनिल देशमुख यांच्यावर तोंडसुख घेतलं, त्यांना बदनामा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायदेवता ही जिवंत आहे. अनिल देशमुख यांच्याबाबत विरोधकांचा वाईट मनुसबा असला तरी अखेर सत्य हे समोर आलेच, असं मत अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केलं.

गेल्या अधिवेशनात अनिल देशमुख यांच्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल झाला. त्यानंतर अनिल देशमुख हे प्रत्येक चौकशीला धाडसाने सामोरे गेले. आज ते या सगळ्यातून तावुनसुलाखून बाहेर पडले आहेत. विरोधकांनी 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणावरुन महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर सत्य समोर आलेच आहे, असं मिटकरी यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना CBI कडून क्लीनचीट”

“हरियाणात भाजप विरोधात शेतकरी आंदोलन, पोलिसांच्या लाठीचार्जमुळं शेतकरी रक्तबंबाळ”

जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा

भाजप आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर- ममता बॅनर्जी