Home देश भाजप आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर- ममता बॅनर्जी

भाजप आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर- ममता बॅनर्जी

कोलकाता : ईडीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात समन्स बजावले आहे.

याशिवाय, बंगाल सीआयडीचे एडीजी ज्ञानवंत सिंग आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बसू यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. यावरून ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

केंद्रातील भाजप सरकार तृणमूल काँग्रेसशी लढण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करत आहे. कारण ते पक्षाशी राजकीय लढाई लढू शकत नाहीत, असा घणाघात ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. तसेच दिल्लीतील भाजपा सरकार राजकारणात आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, तेव्हा ते तपास यंत्रणांचा वापर करतात, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

भाजपचे मंत्री कोळसा माफियांच्या हाताशी आहेत. मी माझ्या राजकीय जीवनात असा सूडबुद्धीने चालणारा पक्ष आणि सरकार कधीच पाहिलं नाही. तुम्ही आम्हाला ईडीचा धाक दाखवल्यास, आम्ही भाजपा नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडे पुरावेही पाठवू, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

10 दिवसात मंदीरे खुली करा अन्यथा…; अण्णा हजारेंचा सरकारला इशारा

अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू; संजय राऊतांचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष इशारा

महाविकास आघाडी पाच वर्ष नाही, तर पुढील 25 वर्षे राज्याची सेवा करणार- सुप्रिया सुळे

वंचितला धक्का! आणखी 2 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; अजित पवारांची भेट यशस्वी ठरली