मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर पोलिसांनी राणेंना अटक केली. त्यानंतर रात्री उशिरा त्याच दिवशी राणेंना जामीन मंजूर झाला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असा अप्रत्यक्ष इशारा संजय राऊतांनी राणेंना यावेळी दिला. ते नाशिकमध्ये बोलत होते.
दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेचं वातावरण आहे. सरकारला नाशिक सारख्या शहरांची ताकद मिळत राहिली पाहिजे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. कार्यक्रम केल्यावर परिणामांची पर्वा करत नाही, असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडी पाच वर्ष नाही, तर पुढील 25 वर्षे राज्याची सेवा करणार- सुप्रिया सुळे
वंचितला धक्का! आणखी 2 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; अजित पवारांची भेट यशस्वी ठरली
“दीड वर्ष घरी बसून फेसबुक लाईव्हवर जनतेला कोरडे उपदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना, कोण श्रेय देणार?”
सेना-भाजप युतीबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…