मुंबई : लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.
माझं कौतुक होत आहे की, या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये कसं नेतृत्व केलं; कसा महाराष्ट्र संभाळला. पण हे श्रेय आहे ते माझं एकट्याचं नाही. माझे मंत्रीमंडळातील सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी, सारे कर्मचारी अगदी सफाई कर्मचारी सुद्धा आणि साहजीकपणे आपल्या राज्यातील नागरिक तसेच प्रसारमाध्यमांनी दिलेली साथसोबत महत्वाची ठरली. तुम्ही जी साथ देत आहात ती त्यावेळेला दिली नसती तर हे कठीण होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं काैतुक केलं. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
तसंही गेली दीड वर्ष घरी बसून फेसबुक लाईव्हवर जनतेला कोरडे उपदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्याला कोण श्रेय देणार आहे? आपलं आपण घेतलं तरच मिळेल, असा टोला अतुल भातखळकरांनी यावेळी लगावला.
तसंही गेली दीड वर्ष घरी बसून फेसबुक लाईव्हवर जनतेला कोरडे उपदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्याला कोण श्रेय देणार आहे? आपलं आपण घेतलं तरच मिळेल… pic.twitter.com/iOeZM06FB8
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 26, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सेना-भाजप युतीबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
आज पण राणेंमुळं शिवसेनेत पद मिळतात, राणे बस नाम ही काफी है; नितेश राणेंचा टोला
उद्धव ठाकरे-फडणवीसांमध्ये बंददाराआड खलबतं; यावर खुद्द फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
“घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला, वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात”