Home महाराष्ट्र सेना-भाजप युतीबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सेना-भाजप युतीबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं.

मात्र ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काही काळ भेट झाल्याचं कळतंय. तसेच ही चर्चा राणेंबाबत झाल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री भेटू शकतात, कारण मुख्यमंत्रिपदाइतकंच विरोधी पक्षनेतेपद आहे., असं नारायण राणे म्हणाले. तसेच सेना-भाजप युती झाली तर…? असा प्रश्न नारायण राणेंना पत्रकारांनी विचारला. यावर, मी जर तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. पण जर युतीचा निर्णय झाला तर पक्ष सांगेल ते मला मान्य असेल, असं नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आज पण राणेंमुळं शिवसेनेत पद मिळतात, राणे बस नाम ही काफी है; नितेश राणेंचा टोला

उद्धव ठाकरे-फडणवीसांमध्ये बंददाराआड खलबतं; यावर खुद्द फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

“घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला, वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात”

“उद्यापासून सलग 4 दिवस बँका बंद राहणार”