मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यात मोहसीन शेख नावाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं होतं. त्याच्या या कामगिरीची दखल घेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडून त्याला मोठं बक्षिस मिळालं.
या कामगिरीचं कौतुक म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरे यांनी मोहसीनची सहसचिवपदी नियुक्ती केली. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या ‘त्या’ युवासेना कार्यकर्त्याची बढती” आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात!! सिर्फ नाम हि काफी है!!, असा टोला नितेश राणे यांनी यावेळी लगावला.
“राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या ‘त्या’ युवासेना कार्यकर्त्याची बढती”
आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात!!
सिर्फ नाम हि काफी है!!! pic.twitter.com/9Mcwn4n1z1
— nitesh rane (@NiteshNRane) August 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे-फडणवीसांमध्ये बंददाराआड खलबतं; यावर खुद्द फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
“घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला, वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात”
“उद्यापासून सलग 4 दिवस बँका बंद राहणार”
“राणेंच्या घरासमोर ताकद दाखविण्याऱ्या युवासैनिकाला आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ मोठं गिफ्ट”