मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. मात्र लगेच रात्री उशिरा त्यांचा जामीन मंजूरही झाला. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. तसेच सेना-भाजपमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या सर्व प्रकरणावर आता विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भाष्य केलं आहे.
हा वाद मिटेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नारायण राणे हे एका ताटात जेवतील. हे राजकारण आहे यामध्ये सर्व गोष्टी चालतात. सेना-भाजप विरोधात असले तरी ते उद्या एका ताटात जेवतील. हे कधीही भांडतील आणि कधीही एकमेकांच्या गळ्यात पडतील, असा दावा प्रवीण तोगडीया यांनी यावेळी केला.
दरम्यान, शिवसेनेनं देश हिताचं काम केलं तर आम्ही शिवसेना जिंदाबाद म्हणू आणि भाजपने काम केलं तर भाजप जिंदाबाद म्हणू, तसंच त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा देखील जय म्हणू. आम्ही आता कोणत्या दलाचे गुलाम नाही, असंही प्रवीण तोगडीया यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“अफगाणिस्तान हादरलं! काबूल विमानतळावर 2 मोठे बाॅम्बस्फोट”
…म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना चपलेनं मारण्याची भाषा केली; संजय राऊतांनी केला खुलासा
“सांगलीत जयंत पाटलांविरोधात भाजप आक्रमक, पालकमंत्री हटाव आंदोलन”
“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रूग्णालयात दाखल”