Home महाराष्ट्र …म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना चपलेनं मारण्याची भाषा केली; संजय राऊतांनी केला खुलासा

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना चपलेनं मारण्याची भाषा केली; संजय राऊतांनी केला खुलासा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. मात्र लगेच रात्री उशिरा त्यांचा जामीन मंजूरही झाला. यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला. तसेच काही प्रश्नही राणेंनी शिवसेनेला केले होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चप्पल मारण्याचं केलेलं वक्तव्य सुसंस्कृतपणा होता का?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला होता. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

आम्हांला छत्रपती शिवरायांबद्दल आदर आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना चप्पल घालुन हार घालत नाही. ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आहे. योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांच्या प्रतिमेला चप्पल घालुन हार घातला होता. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी योगी यांच्याबद्दल असं वक्तव्य केल होतं, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी यावेळी दिलं.

दरम्यान, तुम्ही तुमच्या खात्याचं काम करा, जास्त शहाणपणा करू नका. तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी तुम्हाला केंद्रीय मंत्री केलं आहे. तुम्ही अंगावर येण्याची भाषा करत असाल तर ही शिवसेना आहे. हे आधी लक्षात घ्या, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी राणेंना दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगलीत जयंत पाटलांविरोधात भाजप आक्रमक, पालकमंत्री हटाव आंदोलन”

“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रूग्णालयात दाखल”

“वंचितचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; अजित पवारांच्या भेटीसाठी सोलापूरहून मुंबईत”

कोरोना काळात महाराष्ट्र सावरण्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही तर सर्वांचं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे