नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून फोन येत असून राणेंना आश्वस्त केलं जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील नारायण राणे यांना नुकताच फोन केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यावेळी अमित शहा यांनी नारायण राणे यांची विचारपूस केली. यावेळी अमित शहांनी पोलीस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशीलही नारायण राणेंना विचारल्याचं देखील माहिती समोर येत आहे. भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, काल भाजपच्या नेत्यांकडून नारायण राणेंना समर्थन देणारी वक्तव्ये करण्यात आली होती. तसेच या सर्वातून भाजपने आपण नारायण राणे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा देखील पहायला मिळत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू; विनायक राऊतांचा टोला
संजय राऊत संपादक पदाच्या लायकीचे नाहीत; नारायण राणेंचा हल्लाबोल
“कंडोम नाही म्हणून फेविक्विकचा वापर, सेक्स करताना विचित्र प्रयोगाचा वापर केल्यानं तरूणाचं मृत्यू”
फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, यावर नारायण राणेंचं उत्तर; म्हणाले…