Home महाराष्ट्र भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू; विनायक राऊतांचा टोला

भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू; विनायक राऊतांचा टोला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक झाली. मात्र लगेच काल रात्री उशिरा त्यांचा जामीन मंजूरही झाला. यानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात यवतमाळ, नाशिक आणि उत्तर प्रदेशात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर पोलिस कारवाईसाठी दबाव टाकल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणावर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू आहेत. यांना जे जे लोक विरोध करतील त्यांच्या मागे हे शुक्लकाष्ट लावायचं ही भाजपनं केलेली रणनिती आहे. त्यामुळे त्यांना किती चौकश्या लावायच्या त्या लावू देत, असा टोला राऊतांनी यावेळी भाजपचा लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर ईडी आणि सीबीआय चौकशी लावूनही महाविकास आघाडी सरकार आजही भक्कम आहे आणि उद्याही भक्कम राहील, असा दावाही राऊतांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत संपादक पदाच्या लायकीचे नाहीत; नारायण राणेंचा हल्लाबोल

“कंडोम नाही म्हणून फेविक्विकचा वापर, सेक्स करताना विचित्र प्रयोगाचा वापर केल्यानं तरूणाचं मृत्यू”

फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, यावर नारायण राणेंचं उत्तर; म्हणाले…

…म्हणून मी ‘ते’ वक्तव्य केलं; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला खुलासा