मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक झाली. मात्र लगेच काल रात्री उशिरा त्यांचा जामीन मंजूरही झाला. यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात आज नारायण राणे आणि भाजपविरोधात जोरदार टीका करण्यात आली होती. यावरून राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणेंनी बोलताना, संजय राऊत हे संपादक पदाच्या लायकीचे नाहीत, ते फक्त उद्धव ठाकरे खूश व्हावे इतकंच लिहितात. मी त्यांना 17 तारखेनंतर उत्तर देईन, असं म्हणत राणेंनी संजय राऊतांना इशारा दिला.
दरम्यान, राणेंनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. मी काय असो बोललो होतो, ज्याचा इतका राग आला. मला राजकारणाला 52 वर्ष झाली. आज शिवसेनेने असे शब्द कधी उच्चारले नाहीत काय?, असा सवाल नारायण राणेंनी यावेळी केला. तसेच मला माझ्या राष्ट्राचा अभिमान आहे, म्हणून मी ते वक्तव्य केलं, असं स्पष्टीकरण राणेंनी यावेळी दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
“कंडोम नाही म्हणून फेविक्विकचा वापर, सेक्स करताना विचित्र प्रयोगाचा वापर केल्यानं तरूणाचं मृत्यू”
फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, यावर नारायण राणेंचं उत्तर; म्हणाले…
…म्हणून मी ‘ते’ वक्तव्य केलं; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला खुलासा
“किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून, ज्योतिषीचा धंदा सुरू करावा”