रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विवादित विधान करणारे करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर महाड पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ समोर आला आहे.
अनिल परब यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पोलिसांचे फोन येत होते. याबाबतची खळबळजनक बातमी टीव्ही-9 मराठीने व्हिडीओसह प्रसारित केली आहे.
दरम्यान, नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी भाजप नेते ठिय्या मारून बसले होते. अटक वॉरंट दाखवा, तरच कारवाई करा, अटक वॉरंट असेल तर आम्ही स्वत: गाडीत येऊन बसतो, असे भाजप नेते सांगत होते. तसंच पोलिसांवर राजकीय दबाव आहे, कारवाई करण्याचे आदेश येत आहेत, असंही भाजप नेते म्हणत होते.
काय म्हणाले अनिल परब-
अनिल परब यांना पोलिसांचा फोन होता. त्यांचं बोलणं पत्रकार परिषदेतील माईकमध्ये रेकॉर्ड होत होतं. मी सध्या रत्नागिरीत आहे. मी आता विचारून घेतो सीएम साहेबांना. हो… फक्त मी ठरवतो, मग तसं आपल्याला ताबडतोब ब्रीफ करावं लागेल ना? हो हो हो… मग कोणाला सांगू ब्रीफ करायला? डीजींना सांगतो. मी डीजींना सांगतो. हो… ठीक आहे, मी आता डीजींना सांगतो ताबडतोब… ठीक आहे. मी आता ताबडतोब बोलतो.
त्या दरम्यान आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे मोबाईलमधील काही तरी मेसेज अनिल परब यांना दाखवतात. भास्कर जाधव म्हणतात, कोर्टाने पण नकार दिलाय…
त्यानंतर काही वेळाने अनिल परब फोन लावतात.
हॅलो, काय करताय तुम्ही लोक?
नाय पण ते करावं लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये?
हं…
ऑर्डर कसली मागतायेत ते? ऑर्डर कसली मागतायेत ते?
अहो हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे.
पण मग घ्या ना, पोलीस फोर्स वापरून करा… अहो, वेळ लागणार मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची
ठिकाय… ओके
फोन बंद झाल्यानंतर भास्कर जाधव अनिल परबांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं..
मग अनिल परब भास्कर जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलीस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली. आता पोलीस ओढून बाहेर काढतायेत…
भास्कर जाधव म्हणतात… चला आता (पत्रकार परिषद) संपवायला हवं.
त्या दरम्यान पत्रकार अनिल परब यांना विचारतात, नारायण राणे यांना अटक झाली आहे का?
त्यावर अनिल परब म्हणतात… मला अजून त्याबाबतची माहिती मिळालेली नाही, त्यामुळे मी आता सांगू शकत नाही अटक झाली की नाही.
मी इथे तुमच्यासमोर बसून आहे. मी तुम्हाला त्याबाबत काय सांगू.
महत्वाच्या घडामोडी –
“गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अचानक वर्षा बंगल्यावर; राणे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा?”
महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा भाजपचा कुटील डाव; नाना पटोलेंचा हल्लाबोल
नारायण राणे यांची जी भाषा आहे ती, शिवसेनेचीच भाषा- रामदास आठवले
अटकेनंतर नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाले…