मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्यात काही ठिकाणी शिवसैनिक व भाजपचे कार्यकर्ते समोरसमोर भिडल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत युवासेनेचे पदाधिकारीही वर्षावर आल्यानं चर्चांना उधाण आलं.
दरम्यान, आज झालेल्या एकूण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप वळसे-पाटील यांना बोलावून घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा भाजपचा कुटील डाव; नाना पटोलेंचा हल्लाबोल
नारायण राणे यांची जी भाषा आहे ती, शिवसेनेचीच भाषा- रामदास आठवले
अटकेनंतर नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाले…
कोरोना हृदयसम्राट गप्प का?; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका