मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर नारायण राणेंना पोलिसांनी रत्नागिरीतून अटक केली. या प्रकरणावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. भारतीय जनता पक्ष राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा त्यांचा कुटील डाव आहे, परंतु यात भाजपाला यश येणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवली असती’ हे नारायण राणे यांचं वक्तव्य अशोभनीय आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो. नारायण राणे हे वारंवार मुख्यमंत्र्यांचा ऐकेरी उल्लेख करतात, मुख्यमंत्रिपदाचा मान राखला पाहिजे. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारमधील राज्यातील मंत्री केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती देण्याऐवजी विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्याचे काम करत आहेत, असा आरोपही नाना पटोलेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणे यांची जी भाषा आहे ती, शिवसेनेचीच भाषा- रामदास आठवले
अटकेनंतर नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाले…
कोरोना हृदयसम्राट गप्प का?; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
“नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं वक्तव्य निषेधार्ह, हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान”