मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. या प्रकरणावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.
नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचं होतं. पण तसं न करता चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई केली असल्याचा आरोप रामदास आठवलेंनी यावेळी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणेंना भाषणातून उत्तर द्यायला हवं होतं. पण पोलिसांकडून कारवाई करुन घेतली ती चुकीची आहे. पोलिसांची यात चूक नाही. पोलिसांच्या माध्यमातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चुकीची आहे, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही, असा दावा रामदास आठवले यांनी केला.
महत्वाच्या घडामोडी –
अटकेनंतर नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाले…
कोरोना हृदयसम्राट गप्प का?; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
“नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं वक्तव्य निषेधार्ह, हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान”
अशा कारवाईने आम्ही घाबरणार नाही; राणेंच्या अटकेवर जे. पी. नड्डाांची पहिली प्रतिक्रिया