मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. अटक झाल्यानंतर राणेंनी टाईम्स नाऊला प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
राणेंना व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पत्रकारांनी प्रश्न केला की, उद्धव ठाकरेंना काय सांगाल?, यावर उत्तर देताना राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जे करायचं ते करू दे मला जे करायचं ते म करेल, असं नारायण राणे म्हणाले.
मी दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास जेवत होतो. अचानक तिथं डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असं मला म्हणाले. यावर मी त्यांना नोटीस दाखवा असं म्हणालो. मात्र त्यांच्याकडे नोटीस नव्हती तरीही त्यांनी मला बळजबरीने अटक केली, असंही नारायण राणेंनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
कोरोना हृदयसम्राट गप्प का?; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
“नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं वक्तव्य निषेधार्ह, हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान”
अशा कारवाईने आम्ही घाबरणार नाही; राणेंच्या अटकेवर जे. पी. नड्डाांची पहिली प्रतिक्रिया
तुम्ही साहेबांचा रस्त्यात खून करणार आहात; भाजप नेत्याचा गंभीर आरोप