Home पुणे राज्य सरकारच्या आदेशाचा चंद्रकांत पाटलांना विसर

राज्य सरकारच्या आदेशाचा चंद्रकांत पाटलांना विसर

पुणे : करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारनं तातडीचा उपाय म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. पण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना आदेशाचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून राज्य शासनाने शाळा, कॉलेज, जलतरण तलाव, जिम, मॉल्स आदी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या व्यतिरिक्त कोणताही कार्यक्रम घेऊ नये असेही आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आज पिंपरी-चिंवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. याबैठकीला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यामधील एकून करोनाग्रस्तांचा आकडा 15 वर पोहचला आहे. करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक करोनाबाधित आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही- रामदास आठवले

अजित पवारांचा कॉन्फिडन्स मानावा लागेल; निलेश राणेंच टिकास्त्र

केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही- रुपाली चाकणक