मुंबई : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे काही काळासाठी आपण सण-उत्सव बाजूला ठेवू, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याची परवानगी नाकारली आहे. यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार निशाणा साधलाय.
“उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारने समन्वय समितीने केलेल्या तमाम सूचना धुडकावत दहीहंडी उत्सवावर बंदी लादली, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये, असंही अतुल भातखळकरांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारने समन्वय समितीने केलेल्या तमाम सूचना धुडकावत दहीहंडी उत्सवावर बंदी लादली. या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये.https://t.co/uSS01tIC0b
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे कुटुंबीयांवर टीका करणं हेच राणेंचं पोट भरण्याचं साधन- निलम गोऱ्हे
“मी असतो तर कानाखाली लगावली असती; मुख्यमंत्र्यांवर बोलताना नारायण राणेंची जीभ घसरली”
कोरोना काळात खचून न जाता राजेश टोपेंनी आपली भूमिका सार्थपणे निभावली- सुप्रिया सुळे
“लाचखोरी प्रकरणातील शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं अखेर निलंबन”