नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात सरळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र लिहिले आहे.
सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना 2002 त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवून बँकेचे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणी केदार व इतर 10 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने कोर्टात खटला दाखल केला आहे. हा खटला 19 वर्षांपासून कोर्टात सुरु आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून असिफ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असिफ कुरेशी हे काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते या खटल्यात योग्य बाजू मांडू शकत नाहीत असा आरोप करत ऑडव्होकेट असिफ कुरेशी यांची नेमणूक रद्द करा, अशी मागणीही आशिष देशमुख यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणेंना सूक्ष्म खातं मिळालं, त्यामुळं त्यांचं डोकंही सूक्ष्म झालंय- गुलाबराव पाटील
“मोदींचा पराभव करता येतो, हे महाराष्ट्र आणि बंगालने दाखवून दिलंय”
एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि…; आशिष शेलारांचं सूचक वक्तव्य
“आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट, स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिला नाही”