मुंबई : पंतप्रधान नरेंद्र आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्र येताना दिसत आहेत.
कधी राहुल गांधी यांच्या घरी तर कधी कपिल सिब्बल यांच्या घरी सर्व विरोधक एकत्र येत आहेत. या सर्वांचं आता मोदी आणि शहा यांचा पराभव करणं हे एकच लक्ष आहे. यातच विरोधकांच्या आयोजित 19 राजकीय पक्षांची बैठक झाली. यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र आणि बंगालने दाखवून दिलंय की, मोदी, शहा आणि त्यांनी आखलेल्या रणनितीचा पराभव करता येतो. आता चर्चा पे चर्चा नको, देशाला ठोस कार्यक्रम देण्याची गरज आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. सरकार आम्हाला संसदेत बोलू देत नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदी आणि शहा संसदेत आमच्याशी वाईट वागलं. ही सर्व वक्तव्य विरोधी पक्षांची आहेत., असंही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि…; आशिष शेलारांचं सूचक वक्तव्य
“आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट, स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिला नाही”
“ज्या महापाैरांच्या कार्यक्रमाला गर्दी होते, त्या जनआशिर्वाद यात्रेवर कशा बोलू शकतात?”
भाजपनं पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला; राष्ट्रवादीचा हल्लाबोल