मुंबई : एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले असून, ते केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. मातोश्रीशिवाय ते एक सहीपण करू शकत नाहीत. आमच्याकडे आले तर त्यांना सन्मानाने घेऊ, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे.
एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि त्यांनी नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य का करावं, असं सूचक विधान आशिष शेलार यांनी केलं आहे. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
एकनाथ शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार नाही. शहरांचा सुनियोजित विकास झाला पाहिजे. पण त्या नगर विकास खात्यात सुनियोजितपणा दिसून येत नाही. सिडको आणि एमएमआरडीएचे निर्णय घेताना आम्हाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेच घेताना दिसतात. सध्या सुपर सीएमची पद्धत सुरू झाली आहे. त्याची आम्हाला चिंता आहे, असं सांगतनाच एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि त्यांनी नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य का करावं, असं आशिष शेलार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट, स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिला नाही”
“ज्या महापाैरांच्या कार्यक्रमाला गर्दी होते, त्या जनआशिर्वाद यात्रेवर कशा बोलू शकतात?”
भाजपनं पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
…तर सोमय्या यांनी राणेंच्या बंगल्याचीही पाहणी करावी; शिवसेनेचं किरीट सोमय्यांना आव्हान