Home महाराष्ट्र “आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट, स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिला नाही”

“आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट, स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिला नाही”

मुंबई : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली असल्याचं पहायला मिळत आहे.

बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. 450 रुपये मिळत होते. आपण काही काळापूर्वी एक हजार 125 रुपये केलेले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की, कमीतकमी 2 हजार 500 रुपये त्या लेकरांना द्यायला हवं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत., असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.

या कॅबिनेटमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट आहे. त्यांना रोज लाथाबुक्क्यांचा मार खावा लागत आहे. स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिलाच नाही. मिळेल तेंव्हा लाथा मारण्याचं काम राष्ट्रवादीने सुरू ठेवलं आहे. त्यांचा समन्वयाशी काहीही संबंध नाही. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राचा विचका करत आहे, असा घणाघात शेलारांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“ज्या महापाैरांच्या कार्यक्रमाला गर्दी होते, त्या जनआशिर्वाद यात्रेवर कशा बोलू शकतात?”

भाजपनं पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

…तर सोमय्या यांनी राणेंच्या बंगल्याचीही पाहणी करावी; शिवसेनेचं किरीट सोमय्यांना आव्हान

मंदिरे हा केवळ भावनेचा विषय नव्हे तर…; मनसेची राज्य सरकारवर टीका