Home देश “उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन”

“उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन”

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं आज मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झालं. ते 89 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. आज सकाळपासून त्यांचा रक्तदाब कमी होत होता. त्यांना लघवीलाही त्रास होत होता. त्यामुळे त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आलं होतं. मात्र आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, 4 जुलैला कल्याण सिंह यांना लखनऊच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातून पीजीआय रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. ICU मध्ये चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली. तेंव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा नव्हती. तसेच 17 जुलैला अचानक श्वास घेण्यास अडचण येऊ लागल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

…तेंव्हा राज ठाकरेंना शरद पवारांबद्दल कळलं नाही का?; हसन मुश्रीफांचा सवाल

“नीलम गोऱ्हेंना शिवसेनेत मी आणलं, माझ्यावर टीका करुन कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल”

सांगली जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप; नीलम गोऱ्हेंचा राणेंवर हल्लाबोल