जळगाव : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकत्र आणून बिनविरोध निवडणुका घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शिवसेना नेते गुलाबराव पाटील मध्यस्थी करणार आहेत.
भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. सध्या आता जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी सुरू आहे.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहेत. मात्र, भाजप सोबत येणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेत एकनाथ खडसे यांचं वर्चस्व आहे.
दरम्यान, गिरीश महाजन हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. महाजन यांनीही बिनविरोध निवडणूक घेण्यास सहमती दर्शविली पाहिजे. या निवडणुकीसाठी भेटीगाठी सुरू आहेत. एकनाथ खडसे यांची मुंबईत डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, तसेच शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार व जिल्हा बँक संचालक चिमणराव पाटील, भाजप आमदार व जिल्हा बँक संचालक संजय सावकारे, शिवसेना आमदार व जिल्हा बँक उपाध्यक्ष किशोर पाटील यांनीभेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
…निदान समोरासमोर दोन हात करायची हिम्मत तरी दाखवा; निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा
“…तर दोन महिन्यात माझ्या पैशांनी बाळासाहेबांचे स्मारक बांधेन”
“दीडदमडीच्या लोकांनी बोलू नये, त्यांची तेवढी लायकी नाही”
“रावसाहेब दानवे आणि डाॅ.भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा; MIM आक्रमक”