मुंबई : ‘जन आर्शीवाद यात्रे’च्या प्रारंभी नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. नारायण राणे निघून गेल्यावर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी मी माझ्या पैशाने दोन महिन्यात दर्जेदार स्वरूपाचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधून दाखवेन, असं नारायण राणे म्हणाले आहेत. ते पत्रपरिषदेत बोलत होते.
मी अनेक स्मारक पाहिली अत्यंत सुशोभित असतात. तिथे फुलझाड असतात. इथे काय आहे. साधा साहेबांचा फोटोही दिसत नाही. जे गोमूत्र शिंपडायला आले होते त्यांनी जागतिक किर्तीचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही नारायण राणे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“दीडदमडीच्या लोकांनी बोलू नये, त्यांची तेवढी लायकी नाही”
“रावसाहेब दानवे आणि डाॅ.भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा; MIM आक्रमक”
शरद पवार सध्या नैराश्यात आहेत, म्हणून…; नारायण राणेंचा टोमणा
अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे…; अमोल मिटकरींचा पलटवार