मुंबई : मी ‘कोरोना गो’ च्या घोषणा दिल्या म्हणून जास्त रूग्ण सापडले नाहीत. माझ्या घोषणेबाजीवर लोक टीका करत आहेत पण जोपर्यंत कोरोना जात नाही तोपर्यंत आपण कोरोना गो म्हणत राहूया, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
कोरोना भारतातून हद्दपार व्हावा यासाठी मी ‘कोरोना गो-कोरोना गो’ अशी घोषणाबाजी केली होती. सध्या डॉक्टरांची टीम पूर्णपणे कोरोना भारतातून घालवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
सगळ्या लोकांची जबाबदारी आहे की कोरोनापासून आपला बचाव कसा होईल. त्यासाठी आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत. मला आशा आहे की महाराष्ट्र हिमतीने कोरोनाचा सामना करेल आणि हे संकट परतावून लावेल, असंही आठवलेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे म्हणून शिवजयंती ही तिथीनुसार साजरी करावी”
मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे
“शिमगा नुकताच संपल्यामुळे विरोधकांना कुठला मुहूर्त शिल्लक राहिलेला नाही”
महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल यात शंका नाही- शरद पवार