सांगली : परवानगी नसतानादेखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 41 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून आटपाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्याकडून 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात पडळकर मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. अशातच आज अखेर पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही पडळकर समर्थकांनी जोरदार तयारी करत मध्यरात्री 2 वाजता मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढील काही तासातच ती स्पर्धा भरवली. यानंतर सांगली प्रशासनाने कडक कारवाई केली असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 41 जणांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नितीन गडकरींनी केलं उद्धव ठाकरेंचं कौतुक, म्हणाले तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र…
नारायण राणेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले…
…तर मी त्याच दिवशी भाजपची खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजीराजेंचा मोठा गाैफ्यस्फोट