नागपूर : महाराष्ट्राच्या मुख्यत्वे मुंबई आणि ठाण्याच्या विकासासाठी एक लाख कोटी जास्तचे देईन. महाराष्ट्राचा विकास हा तुमच्या नेतृत्वात व्हावा, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. ते आज नागपूर येथील कस्तुरचंद पार्क मेट्रो मार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
आपल्या राज्याची प्रगती झाली पाहिजे, असं महाराष्ट्रातील दिल्लीमध्ये असणाऱ्या मंत्र्यांना वाटते. कारण, आम्ही महाराष्ट्रीय आहोत. पूर्ण देशात काम करतोच आहे. पण, महाराष्ट्र आमचे घर आहे. तुमच्या नेतृत्वातही महाराष्ट्र बदलतो आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या मेट्रोला परवानी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे, हरदीप पुरी यांनी आम्हाला सतत पाठिंबा दिला. मेट्रोचा सेकंड फेजदेखील हरदीप पुरी यांनी मंजूर केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी नगरोत्थानमधून आम्हाला मदत केली होती. नागपूर शहरातील जुने रस्ते चांगले झालेत. तुम्ही आणि एकनाथ खडसे यांनी मदत केली. पुढेही तुमचा असाच पाठिंबा मिळाला तर आणखी रस्ते बनतील, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या कामाचंदेखील कौतुक नितीन गडकरी यांनी केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले…
…तर मी त्याच दिवशी भाजपची खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजीराजेंचा मोठा गाैफ्यस्फोट
“भाजप नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक व शाईफेक”