मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकाटावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एका सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत टाॅप-5 मध्ये स्थान मिळालं आहे. इंडिया टुडे ‘मूड ऑफ द नेशन’नं हा सर्व्हे केला.
तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम के स्टालिन हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना 42 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना 38 टक्के लोकांची पसंती आहे. केरळ मुख्यमंत्री पी विजयन तिसऱ्या स्थानावर असून त्यांना 35 टक्के लोकांची पसंती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांना 31 टक्के लोकांची पसंती असून ते चौथ्या स्थानावर आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या यादीत पाचवं स्थान मिळालं आहे.
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सहाव्या, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातव्या, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आठव्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन दहाव्या, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल अकराव्या स्थानावर आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
…तर मी त्याच दिवशी भाजपची खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजीराजेंचा मोठा गाैफ्यस्फोट
“भाजप नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक व शाईफेक”
“राष्ट्रवादीचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण”
राणे म्हणतात, आता उद्धव काळ संपला; संजय राऊत म्हणाले…