Home महाराष्ट्र आम्ही निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असता तर तेच गोमूत्र…; निलेश राणेंचा...

आम्ही निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असता तर तेच गोमूत्र…; निलेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालपासून जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाले. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

स्व. बाळासाहेबांच्या स्मारकावर ते कोण आडवे येणार होते त्यांच्यातला एक सुद्धा दिसला नाही. धमकीची वार्ता राणेंसोबत करायची नाही, धमक्यांना भीक घालत नाही आम्ही. निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो. औकातीत राहायचं., असा हल्लाबोल निलेश राणेंनी यावेळी केला.

दरम्यान, नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असं शिवसेना नेते विनायक राऊत यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“आमदार गोपीचंद पडळकरांनी करून दाखविलं, पोलिसांना गुंगारा देत अखेर बैलगाडी शर्यत संपन्न”

अडवण्याची भाषा करणाऱ्यांनी पुढच्या वेळी चड्डीत राहायचं; नितेश राणेंचा घणाघात

शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण; नारायण राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

अशोक चव्हाण यांना ‘विश्वासघातकी पुरस्कार’ दिला जाणार; आरक्षणावरुन विनायक मेटेंची टीका