Home महाराष्ट्र शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण; नारायण राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण; नारायण राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाले. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. यावर आता नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे

‘मी विमानतळावर उतरलो बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. नंतर शिवाजी पार्कवर वीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मी नतमस्तक झालो. मी आज जे आहे ते बाळासाहेबांमुळेच. स्मारकाच्या ठिकणी नतमस्तक होऊन, मी साहेब आपण आज असायला हवे होता असं म्हणालो. आजच्या राज्यकर्त्यांकडे मनाचे मोठेपण असायला हवं होतं, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, साहेबांचे स्मारक पाहिले आणि दुःख झाले. सुशोभीकरण करण्या इतपत पुत्राकडे पैसे नसावेत. मी तिथून निघालो आणि पाच-सहा टाळकी तिथं गेली. तिथे गोमुत्र शिंपडलं, शुद्धीकरण केलं. काय मोठं काम केलं. स्वतः जायचं होतं गोमुत्र घेऊन. आधी मनाचे शुद्धीकरण करा. जागेचे शुद्धीकरण करायला जे शिंपडले ते स्वत: घ्या. स्वतःचे शुद्धीकरण करा जरा’, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अशोक चव्हाण यांना ‘विश्वासघातकी पुरस्कार’ दिला जाणार; आरक्षणावरुन विनायक मेटेंची टीका

“…तर आता शिवसेनेचं शुद्धीकरण करावं लागेल”

“नारायण राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला शिवसैनिकांकडून शुद्धीकरण”

आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच, मग आम्ही दाखवू की…; सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा