मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात असताना इतर संघटनांकडूनही हल्लाबोल केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनीही काँग्रेसनेते अशोक यांच्यावर टीका केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला 24 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांना विश्वासघातकी पुरस्कार दिला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विनायक मेटे यांनी दिली.
102 व्या घटनादुरुस्तीबाबत जो कायदा करण्यात आला आहे, त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकार याबाबत काहीच पावलं उचलत नाही. बैठकीत उद्धव ठाकरे सरकारबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. तसंच अजित पवार यांच्या अभिनंदनाचाही ठरावं करण्यात आला. त्यांनी सारथी संस्थेबाबत उत्तम काम केलं आहे, असं विनायक मेटे म्हणाले आहेत.
दरमयान, राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये बहुतांश लोकं मराठा समाजाच्या विरोधात काम करणारे आहेत. मुळात आयोगावरील लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. मात्र लोणावळा येथे आयोजित एका ओबीसी समाजाच्या बैठकीला ही मंडळी गेली होती. तिथे त्यांनी भाषणं देखिल केली होती. आम्ही आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला. कारण त्यांनी त्यांच्या संस्थेत 1 वर्षे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केलं आहे, असंही विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…तर आता शिवसेनेचं शुद्धीकरण करावं लागेल”
“नारायण राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला शिवसैनिकांकडून शुद्धीकरण”
आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच, मग आम्ही दाखवू की…; सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा
‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा’; जन आशीर्वाद यात्रेवरुन राष्ट्रवादीची टीका